HW News Marathi
महाराष्ट्र

आता वाढला नव्या व्हेरियंटचा धोका;, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला ‘हा’ इशारा

मुंबई | दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (२८ नोव्हेंबर) बैठक बोलवली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट हा काळजी करण्यासारखा असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन केले आहे. तसेच देशात अद्याप नवा व्हेरियंट आपल्या देशात सापडाल नाही. तरी देखील राज्यातील जनतेने सतर्क राहावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. WHO ने ९ नोव्हेंबरला नव्या व्हेरियंटची माहिती मिळाली

दरम्यान, आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांनी ७२ तासाचे आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे गरजेचे आहे. अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असल्याचेही टोपेंनी सांगितले. तसेच राज्यातील जनतेने सर्वांना सर्तक रहावे लागेल, असेही टोपेंनी सांगितले. तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तीस ७२ तासांपूर्वी कोरोनाचा नेगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे आहे.

दक्षिण आफ्रिकेतील येणारे विमान थांबवायला हवी, परंतु ठराविक विमाने बंद करण्याचा अधिकार केंद्रकडे असल्याची माहिती टोपेंनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे. देशात ह्या प्रकारच्या कोरोना व्हेरियंट सापडलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. तर केंद्रने आज कोरोनासंदर्भात बैठक बोलवली आहे. या बैठकीकडे केंद्र सरकार कोणत्या निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दोन्ही डोस घेतल्यानंतरही नव्या व्हेरियंटचा धोका

राज्यात आतापर्यंत ११ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. राज्यातून साडे तीन कोटीचे लोकांनी लसीचा दुसरा डोस तर साडे सात कोटी जनतेने लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे टोपेंनी सांगतिले. तसेच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्या लसवंतांनाही नव्या कोरोना व्हेरियंटचा धोका असल्याचे टोपेंनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो,” मुनगंटीवारांनी गृहमंत्र्यांना सुनावले

News Desk

कर्जत नगरपंचयात निवडणुकीत रोहित पवारांचे वर्चस्व; १७ पैकी १२ जागांवर विजयी

Aprna

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, दरेकरांचा गृहमंत्र्यांना सल्ला

News Desk