HW News Marathi
महाराष्ट्र

मरकजमध्ये सहभागी झालेल्या १४०० पैकी फक्त ५० जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या, पत्रकारांच्या अनेक शंकांचे निरसन केले. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोरोनाबाधितांचा राज्यातला आकडा हा ३१०० झाला आहे. तसेच, कोरोनातून बरे होऊन डिस्चार्ज झालेल्यांचा आकडाही ३०० पर्यंत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ज्यांना कोरोना झाला आहे किंवा कोरोना सदृश्य लक्षणे आहेत त्यांना घाबरुन न जाता कोरोनबद्दल माहिती घ्या, अशा प्रकारचा एक विश्वास त्यांनी दिला. तसेच, या ३१०० पैकी ७० टक्के लोकांना लक्षणेच नाही आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ६ महिन्यांचे बाळ आणि ८३ वर्षांच्या आजी याही कोरोनावर मोत करुन आत्मविश्वास, रोगप्रतिकारक शक्तीच्या दोरावर जर बरे होऊ शकतात तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक दिलासादायक बाब आहे, असेही यावेळी टोपे यांनी सांगितले. तसेच, कोरोनासाठी जी कमिटी डॉ. सुपेत यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे त्यात रुग्ण एडमिट झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंतचा त्यांचा केस पेपर आणि महत्त्वाच्या बाबी याकडे लक्ष दिले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कोरोनाच्या टेस्टिंग बाबतही त्यांनी महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. देशात कोरोनाच्या झालेल्या टेस्टिंगपैकी जवळपास २० टक्के टेस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात झाले आहे. आत्तापर्यंत राज्यात ५१ हजार टेस्टिंग झाल्या आहेत. यातील ५० टक्के टेस्टिंग तर फक्त मुंबईतच झाले आहे. तसेच, राज्यात १५ सरकारी आणि १५ प्राईव्हेट अशा एकूण ३० टेस्टिंग लॅब आहेत. पण, सरकारी ६ लॅब वाढण्यात येणार असून राज्यात एकूम ३६ टेस्टिंग लॅब असतील, ज्याने चाचण्या लवकर होतील आणि लोकांना त्यांचे पॉझिटिविह अथवा निगेटिव्ह रिपोर्ट वेळेत मिळतील आणि उपचाराला सुरुलात होईल.

तसेच, ICMR कडे पूल टेस्टिंग आणि रॅपिड टेस्टिंगची परवानगीही मागितल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पूल टेस्टिंगमूळे एकावेळी २०-३० Sample यांची एकत्र चाचणी केली जाईल आणि त्यांचा जो काही रिपोर्ट येईल त्या रुग्णांची चाचणी एक-एक करुन करण्याची गरज भासणार नाही, आणि त्याने वेळही वाचेल. दरम्यान, कोरोनाहा हा Pandemic रोग आहे आणि त्यावर आधुनिक पद्धतीची प्लाझ्मा चाचणी करम्यात येत आहे. प्याझ्मा चाचणी म्हणजे, जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांच्यातील रक्तातील प्लाझ्मा हा बाधितांच्या शरीरात टाकला जातो जेणेकरुन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

तसेच, पीपीई किट्सची मागणी ही केंद्रसरकारकडे ८ लाख मागितले होते त्यापैकी १ लाख आले, एन ९५ मास्क साडेतील लाख मागितले होते ते ३० हजार आले. याचाच अर्थ केंद्र सरकार मदत करत आहे मात्र लवकर करावी अशी विनंती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्राच्या आरोग्यमंत्र्यांना या माध्यमातून केली. तसेच, दिल्लीतील निजानुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या १०० टक्के लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. १४०० पैकी ५० जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे तर बाकी सगळ्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याची एक सुकद बातमीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

तसेच, २० एप्रिलनंतर काही ठिकाणी लॉकडाऊन हा सरकारकडून शिथिल करण्यात येत असला तरी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. केंद्र सरकारने ऑफिससाठीच्या ज्या सूचना दिल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांनी पाळाव्यात असेही त्यांनी सांगितले. तसेच, शाळा, कॉलेज सगळं बंदच राहणार आहे आणि त्यांच्यासाठी लॉकडाऊनचे नियम हे कठोरच असतील असेही आरोग्यमंत्री राजेस टोपे यांनी सांगितले. ऊyenr400 paiki 50 positive baki sgle negativee ani 30 k ale…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गॅगस्टार सुरेश पुजारीच्या तीन हस्तकांना अटक

News Desk

कोरोनाबाधित क्षेत्रातील कारागृहे लॉकडाऊन करणार

News Desk

शरद पवार पंतप्रधान कधी होणार?; चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचे सणसणीत उत्तर!

News Desk