HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत आज सुनावणी

मुंबई | भाजप आमदारांनी निलंबन मागे घेण्याबाबत अर्ज केल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून त्या अर्जाची दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या १२ निलंबित आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाणार की नाही? याबाबत आज (१० जानेवारी) थोड्याच वेळात विधानसभा उपाध्यक्ष यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. तसेच उद्या याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील होणार आहे. तर त्याआधी निलंबन मागे घेतलं जातं का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपच्या काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला होता. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना तालिका अध्यक्षासमोरचा माइक खेचणे व राजदंड उचलणे, तसेच विधानसभा तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यामुळे गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या भाजपच्या आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. सत्ताधारी पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत निलंबनाचा ठराव आणला होता. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हा ठराव मांडला होता.

त्यानंतर या आमदारांनी निलंबन मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने या आमदारांचं निलंबन मागे घेण्यास नकार दिला होता. तर न्यायालयाने या आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवून राज्य सरकार आणि विधिमंडळास आपली भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार उद्या (११ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी पार पडणार आहे.

कोणते आमदार निलंबित झालेत ?

दरम्यान, निलंबित केलेल्या आमदारांमध्ये आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, संजय कुटे, हरीश पिंपळी, पराग अळवणी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचा समावेश आहे. तर आज होणाऱ्या या सुनावणीला अतुल भातखळकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही असं त्यांनी पत्राद्वारे कळवलं आहे. याशिवाय गिरीश महाजन, राम सातपुते हे देखील उपस्थित राहू शकणार नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील

News Desk

‘जम्बो’बाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा – मुरलीधर मोहोळ

News Desk

शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील राष्ट्रवादीत; एकनाथ खडसे गटाकडून शिवसेनेला हादरा

News Desk