मुंबई | मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबई, सोलापूर, पुणे, कोकण, सगळीकडे पावसाने हाहाकार माजला आहे. पुण्यात काल रात्री मुसळधार पावसानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून, आज मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्यानं मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, १४ आणि १५ तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास सुरू होईल, असं हवामान विभागानं म्हटलं होतं. त्यानुसार १४ ऑक्टोबरपासून राज्यात पावसानं जोर धरला असून, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आहे.
कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेनं सरकत असून, मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अत्यंत महत्वाचे Very IMP
With latest Satellite/Radar observations, Entire North Konkan is updated to Orange Alert with Raigad Red Alert & 15 Oct entire North Konkan is on Red Alert including Mumbai Thane.
Very severe convection is being observed.Take max precaution
RMC Mumbai pic.twitter.com/jA39ur876n— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 14, 2020
राज्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसानं जोर धरला असून, राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची संततधार कायम आहे. परतीच्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले असून, राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्याचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं अनेक ठिकाणी पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. १६ तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
#WATCH: Heavy rainfall triggers waterlogging in parts of Pune; visuals from near Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple. #Maharashtra pic.twitter.com/1NyGodKDaB
— ANI (@ANI) October 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.