मुंबई | काल (३ ऑगस्ट) रात्रीपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. समुद्राच्या भरतीमुळे वडाळा आणि परळ या भागात पाणी साचल्याने मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर उपनगरी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वाशी आणि पनवेल आणि ठाण्यापासून पुढे कल्याण दरम्यान लोकल सेवा चालू आहेत. तर या स्थानकांदरम्यान कोणत्याही उपनगरीय गाड्या थांबणार नाहीत. मेल एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक पावसामुळे नव्याने तयार केले जात आहे, असे मध्यरेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून आज (४ ऑगस्ट) देखील दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व आपत्कालीन सेवा वगळता मुंबईतील सर्व कार्यालये आणि आस्थापने बंद राहतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेनेकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईतील कुर्ला, दादर, सायन, किंग्ज सर्कल याठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुढील २४ तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतकर्ता बाळगावी, अशा इशारा पालिकेतर्फे नागरिकांना दिला आहे. गेल्या आठवड्यात काही दिवस पाऊस गैरहजर होता मात्र कालपासून त्याने पुन्हा हजेरी लावली आहे.
Maharashtra: Severe waterlogging in various parts of Mumbai following incessant rainfall in the city; visuals from Parel East.
More than 230 mm of rainfall recorded in Mumbai city in the last 10 hours, according to Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/JVhEWcICvK
— ANI (@ANI) August 4, 2020
मुंबईसह उपनगरात आज (४ ऑगस्ट) आणि उद्या (५ ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत नागरिकांना जाण्यास मज्जाव केला आहे.सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे आणि २९९ ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले असून याकरिता आवश्यक त्या डिझेलची व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक उदंचन संच चालकांना देण्यात आले आहेत.
Western line completely stopped & harbour line stopped between Kurla & Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT); central line is running with slow speed: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #MumbaiRain
— ANI (@ANI) August 4, 2020
अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह आणि साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बेस्ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांची मदत पथके तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
Mumbai: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has appealed to all offices and other establishments to remain shut today, except emergency services, in view of heavy rainfall forecast.
— ANI (@ANI) August 4, 2020
मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरित मदतीकरिता उघडून ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाद्वारे देण्यात आले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.