मुंबई। हवामान विभाच्या मतानुसार महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत दमदार पावसानं हजेरी लावली. भारतीय हवामान विभागानं आता नवीन अंदाज जारी केला आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, पालघर आणि नाशिकमध्ये तीव्र मुसळधारचा पण इशारा आज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उद्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी काही इशारे या भागात आहेत.
नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट
भारतीय हवामान विभागांनं पालघर जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिला आहे. ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे ,औरंगाबाद, अहमदगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
31 Aug #पालघर, #ठाणे, #नवीमुंबई, #मुंबई, #रायगड, #नंदूरबार, #धुळे, #जळगाव, #नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता. पालघर नाशिक मध्ये तीव्र मुसळधारचा पण इशारा आज IMD, @RMC_Mumbaiने दिला आहे.
उद्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी काही इशारे ह्या भागात आहेत. pic.twitter.com/djwFobrbJu— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2021
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात सोमवार सांयकांळ पासून मुसळधार पाऊस सुरू झाला. गडचिरोली चामोर्शी आष्टी महामार्ग चामोशी हून गोविंदगाव गावापासून बंद झालेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्या रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी वाहत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची परवानगी बंद करण्यात आली. या महामार्गावर वाहतूक सध्या बंद आहे.
नागपूर जिल्ह्यात वीज पडून गुराखी व 5 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हिंगणा तालुक्यातील रायपूर शिवारात घटना घडली. दलसिंह भाऊ राठोड़ असे मृत व्यक्तीचं नाव आहे. ते नेहमीप्रमाणे रायपूर शिवारात नाग नदीच्या काठावर बकऱ्या चरायला घेऊन गेले होते. पाऊस व विजेचा कडकडाट सुरूच होता,त्या परिसरात वीज पडली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दलसिंह राठोड़ रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता मृतदेह आढळून आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.