HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई | कोकणात मुसळधार पावसामुळे आज (१५ जुलै) चिपळूण, खेड परिसर जलमय झाला आहे. तर जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली आहे. येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पावसामुळे चिपळून तालुक्यातील वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. खेड तालुक्यात जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथे दरड कोसळून दहा घरांना धोका निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य बस स्थानकादरम्यानही पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राष्ट्रवादीच काम सर्वात वेगानं, मोदी सरकारचा कारभार चुकीचाच’- जयंत पाटील

News Desk

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत कोणत्याही वर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतील

News Desk

“ST महामंडळाच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही!”

News Desk