HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत वारे ताशी ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची शक्यता आहे.

येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Aprna

‘टॉनिक’च संपल्यामुळे बाळसे म्हणून दिसणारी सूज उतरली, सामनातून भाजपवर टीका

News Desk

भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन

Aprna