HW News Marathi
महाराष्ट्र

‘हिरोईन’ शब्दाचा अर्थ नायिका म्हणजे कर्तबगार महिला, लोणीकरांचे स्पष्टीकरण

मुंबई | “हिरोईन शब्दाचा मराठीत नायिका असा होतो आणि नायिका म्हणजे कर्तबगार महिला,” असे म्हणात भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदारांचा थेट ‘हिरोईन’ उल्लेख केल्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. लोणीकर पुढे म्हणाले की, तहसीलदारांबद्दल हिरोईन हा शब्द आदराने वापरला. विरोधकांनी हिरोईन शब्दाचे भांडवल करु नये, असे ते म्हणाले आहे.

“शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉईन आणू आणि हिरॉईन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच,” असे बेताल वक्तव्य लोणीकरांनी केले आहे. लोणीकरांच्या या भाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जालन्यातील परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या ३३ केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात महिला तहसीलदारांचा थेट ‘हिरोईन’ असा उल्लेख केला. लोणीकरांच्या या भाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोणीकरांच्या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केल्यानंतर स्पष्टीकरण दिले.

हिरोईनचा अर्थ नायिका म्हणजे कर्तबगार महिला

शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेले नाही. यासाठी मोर्चा काढण्यासंदर्भात मी बोलत होतो. बोलताना मी तहसीलदार यांचा ‘हिरोईन’ असा उल्लेख केला, याचा अर्थ वाईट होतो असे होत नाही. हिरोईन शब्दाचा मराठीत नायिका असा होतो आणि नायिका म्हणजे कर्तबगार महिला असा होतो. तहसीलदारांबद्दल हिरोईन हा शब्द आदराने वापरला. विरोधकांनी हिरोईन शब्दाचे भांडवल करु नये. मी हिरोईन हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला होता आणि तो शब्द वाईटही नाही, असे स्पष्टीकरण लोणीकरांनी दिले.

बबनराव लोणीकर नेमके काय म्हणाले

लोणीकर म्हणाले की, “सरकारकडून २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो. आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर २५ हजार लोक आणेल, ५० हजार लोक आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणू, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचे तुम्हाला वाटले तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटले. तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील, असे भाषण बबनराव लोणीकरांनी केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हा प्रशासन, पोलिसांनी आता अधिक सतर्क राहून लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करावे !

News Desk

परशुराम घाट पुन्हा बंद होणार; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Chetan Kirdat

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करुन देणार, ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk