HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा उद्या निकाल | उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

मुंबई | राज्यातील एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल उद्या (२३ मे) सकाळी ११ वाजरा लागणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे. राज्यभरातील सुमारे ३६ हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्व परीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती.

दरम्यान, राज्यभरातील १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यींनी परिक्षा दिली आहे. या परिक्षेचा निकाल ३१ मे रोजी लागणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे निकाल लांबणीवर केला, आणि याच निकाल उद्या लागणार आहे.

निकाल लागण्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार ३६ हजार जागांवर प्रवेश मिळणार आहे. गेल्यावर्षी याच प्रवेश परीक्षेत बोगस प्रवेश आढळल्याने यंदा ‘एमबीए’, ‘एमएमएस’ प्रवेशासाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची ‘सीईटी’, ‘सीमॅट’ आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी ‘कॅट’ परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

 

Related posts

गेल्या २८ दिवसांमध्ये देशातील १५ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk

#Coronavirus :  मुंबईतील ३१ पत्रकारांची कोरोनावर यशस्वी मात

News Desk

पहिल्या पावसात पैनगंगेला दुथंडी

शुभम शिंदे