HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

विनोद तावडे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई | विधीमंडळाच्या सभागृहात आज (२६ जून) अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवेश नियंत्रण समतिच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे तावडेंनी सांगितले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. परंतु विद्यार्थ्यांना वेळेत ही प्रमाणपत्रे मिळत नव्हती. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी मिळालेला प्रवेशावर विद्यार्थ्यांमध्ये सभ्रम अवस्था निर्माण होत होती. त्या संदर्भात विद्यार्थी व पालकांकडून सातत्याने तक्रारी केल्यानंतर आता तावडेंनी केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अधिक सोयीचे झाले आहे.

Related posts

जाणून घ्या…राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण

News Desk

राज्य सरकारला दुष्काळाच्या माहितीसाठी अजून किती वेळ हवा? , न्यायालयाचे ताशेरे

News Desk

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीविषयी केलेल्या विधानाबाबत पित्रोदा यांनी माफी मागावी !

News Desk