HW News Marathi
महाराष्ट्र

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते, SIT समितीच्या तपासात उघड

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात ड्रग्ज सापडल्याने एनसीबीने अटक केले होती. परंतु, आता आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हाते, असा अनुमान एनसीबीच्या एसआयटी समिनीने केलेल्या तपासा कळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच आर्यन खानचा ड्रग्ज रॅकेटशी कोणताही संबंध नसल्याचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. 

दरम्यान,  या प्रकरणाचा तपास एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी छाप्यात आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. वानखेडेंच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर एनसीबीने क्रूझ प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोडविला. या प्रकरणाचा अद्यापही एसआयटीचा तपास पूर्ण झालेला नाही. या समितीचा अंतिम अहवाल येण्यासाठी एक महिना लागू शकतो, अशी माहिती एनसीबीचे एस. एन.  प्रधान यांनी सांगितले आहे.  

कॉर्डेलिया क्रूझमध्ये २ ऑक्टोबरला एनसीबीने  छापा टाकला होता. यात एनसीबीला १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम गांजा तसेच दीड लाखांपर्यंत रोकड जप्त केली होती. यात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानकडे आम्ली पदार्थ सापडल्यामुळे एनसीबीने त्यांना अटक केले होते. यानंतर आर्यनला मुंबईच्या आर्थर जेलमध्ये होता. यानंतर आर्यनला जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. पंरतु, न्यायालयाने दोन वेळा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.  या प्रकरणी आर्यन खान हा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गेल्या २६ दिवसांनंतर आर्यनला २८ ऑक्टोबरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर मिळाला आहे. आर्यनला ३० ऑक्टोबरला तुरुंगातून सुटका झाली. या प्रकरणात आर्यन खानसह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट अटक केली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीच्या रस्त्यावर जी दंडुकेशाही झाली त्याची जबाबदारी फक्त शेतकरी आंदोलकांवर टाकून चालणार नाही – सामना 

News Desk

राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका होणार, गृहमंत्र्यांचा निर्णय

News Desk

राज्यसरकारने प्रयत्न केले असते तर सुप्रीम कोर्टाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पण निर्णय द्यावा लागला असता

News Desk