HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट पीडितेच्या न्यायासाठी आज वर्ध्यात पुन्हा एकदा बंदची हाक

वर्धा | हिंगणघाट येथील महिलांच्या सुरक्षेचा आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घडलेल्या घटनेचे पडसाद देशभर उमटलेले आहेत. भरदिवसा जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेल्या या तरुण पीडितेमुळे महाविद्यालयीन तरुणी, स्त्रियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी, पीडितेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागण्यांकरिता वर्धा शहरात आज पुन्हा एकदा (६ फेब्रुवारी) वर्धा बंदची दाक देण्यात आली असून भव्य मोर्चाचे आयोजनही करण्यात आलेल आहे. या बंदसाठी वर्धा जिल्ह्यातील समस्त राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या मोर्च्याची सुरुवात सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन सुरु झाली असून मेन रोड मार्गे निर्मल बेकरी चौक ते अंबिका उपहार गृह चौक ते इतवारा रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून समाप्त होईल.

या मोर्च्यात समस्त वर्धा जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील तरुण तरुणी, शिक्षक-शिक्षिका तसेच व्यापारी प्रतिष्ठानही सहभागी होऊन पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन वर्धा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनांनी केलेले आहे. वर्धा बंदचे आवाहन हे सकाळी१-२ या कालावधीतच असणार आहे.

नेमके काय झाले होते त्या भरदिवशी?

हिंगणघाटमधील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केली होती. माथेफिरू तरुणाने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते. तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण जळल्यामुळे तिची वाचाही गेली होती. हिंगणघाट पीडितेला सरकारने मदतीचा हात दिला असून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा’ असं म्हणत पीडित तरुणीच्या आईने संताप व्यक्त केला होता.

पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला पेट्रोल टाकून जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ‘मुलीची अवस्था बघवत नाही. ती हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा. मुलालाही त्याच वेदना झाल्या पाहिजेत’ अशी संतप्त प्रक्रिया पीडित तरुणीच्या आईने एका वृत्तवाहिनीला दिली होती. दरम्यान, पीडितेवर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आता ती पापण्याही उघडत नसल्याची चिंताजनक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजकीय नेत्यांचे प्रबोधन कोण करणार ? हाच यक्ष प्रश्न”, महापौरांचा टोला

News Desk

पूर, दरड समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुंटे समितीची स्थापना!

News Desk

उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार?, राऊतांच्या विधानावर शरद पवार म्हणतात..

News Desk