HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीत कांड | पीडितेच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करू !

मुंबई | हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारीला झालेल्या जळीत कांडातील तरुणीची प्राणज्योत आज (१० फेब्रुवारी) मालवली. नागपूरच्या ऑरेंज हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपूर तसेच मुंबईच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा खुप प्रयत्न केला. पण अखेर दुर्देवाने तिचा मृत्यू झाला अशी खंत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. पीडितेच्या कुटुंबींयांच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करु असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, पीडितेच्या भावाला शासनाकडून नोकरी मिळवून देऊ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

राज्यपालांचे महत्व माझ्यापेक्षा जास्त विरोधकांना माहिती; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

Aprna

Maratha Reservation | डॉ. हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड

News Desk