पुणे | देशात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील बायोटेक कंपनी Novavax आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात अखेर सुरुवात झाली आहे.
ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिेएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला यांनी दिली आहे.
जानेवारी महिन्यात Novavax या लसीची चाचणी ही आफ्रिकेतील २४५ कोरोना रुग्णांवर करण्यात आली होती. त्यानंतर या लसीची ट्रायल ही ब्रिटनमधील १५,००० कोरोना रुग्णांवर करण्यात आली. त्यावेळी कोरोनाच्या मूळच्या स्ट्रेन विरोधात ही लस ९६.४ टक्के प्रभावी ठरली तर ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनविरोधात ती ८६.३ टक्के प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.
Covovax trials finally begin in India; the vaccine is made through a partnership with @Novavax and @SerumInstIndia. It has been tested against African and UK variants of #COVID19 and has an overall efficacy of 89%. Hope to launch by September 2021! https://t.co/GyV6AQZWdV
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) March 27, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.