HW News Marathi
देश / विदेश

भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल – अदर पुनावाला

मुंबई | कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आताच्या घडीला तरी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे. भारतासह जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतात बहुतांश नागरिकांना सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्डची लस दिली जात आहे. मात्र, या लसीमुळे परदेशी जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्या वाढताना दिसत आहे. कारण कोव्हिशिल्ड लसीला युरोपीय संघांच्या देशांमध्ये मान्यता नसल्याचे समोर येत आहे. मात्र, याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिलासादायक ट्विट केले आहे. याबाबत मी सर्वांना हमी देतो, असे अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

कोव्हिड ग्रीन पाससाठी पात्रता निकषांमधून युरोपियन युनियनने कोव्हिशिल्ड लसीला वगळले आहे. युरोपीयन संघात सहभागी असलेल्या अनेक देशांनी डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे. युरोपीय देशांमध्ये कामासाठी, पर्यटनासाठी वा अन्य कारणांसाठी जाणाऱ्यांना डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट आवश्यक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, कोव्हिशिल्ड लसीला मान्यता नसल्यामुळे युरोपीय संघातील देशांमध्ये जाताना भारतीयांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. मात्र, हा मुद्दा उपस्थित होताच सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने याची दखल घेत एक दिलासा देणारे ट्विट केले आहे.

“मी सर्वांना हमी देतो कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या बर्‍याच भारतीयांना युरोपियन युनियनमधील देशांमध्ये प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे मला समजले आहे. मी सर्वांना हमी देतो, की मी हे प्रकरण उच्च स्तरावर उचलून धरले आहे. संबंधित देशांसोबत नियामकांसह राजनैतिक पातळीवर लवकरच ही समस्या मिटण्याची आशा आहे”, असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. १ जुलैपासून युरोपियन देशांमध्ये डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट अमलात आणला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पी. चिदंबरम यांची सीबीआय चौकशी

News Desk

शंभर पूल अतिधोकादायक

News Desk

आई ओरडली म्हणून इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

News Desk