नागपूर | एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. कालपर्यंत देशात ४५ वर्षांपक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोना लस दिली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो वा यरल झाला आहे.
त्याचे वय ४५ च्या वर नसतानादेखील त्यांना लस कशी काय मिळाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ पेक्षा अधिक नाही आहे. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ ‘सोशल मीडिया’वर वायरल झाला होता.
‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट असताना देखील फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळाली. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, मग इतर लोक काय किड्यामुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने ‘टि्वटर’वर उपस्थित केला आहे.
Dear @Dev_Fadnavis, is your Nephew Tanmay Fadnavis 45+ years old?
If not, how is he eligible for taking the Vaccine?
Just like Remdesivir, are you hoarding Vaccines & giving it to your family members?
People are dying. There is Vaccine Shortage. But Fadnavis family is Safe. pic.twitter.com/6vjwIqNuEI
— Srivatsa (@srivatsayb) April 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.