HW News Marathi
महाराष्ट्र

क्रूझवर कशा पद्धतीने NCB ने ड्रग्ज आणले; नवाब मलिकांचा स्पेशल २६ पत्रातून गौप्यस्फोट

मुंबई। क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. एनसीबीच्या ड्रग्ज कारवाईवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट स्पेशल २६च्या पत्रातून केला आहे. या पत्राद्वारे कशाप्रकारे बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवले गेले आणि ड्रग्ज नसतानाही समीर वानखेडे यांनी ड्रग्ज आढळल्याचे सांगितले याचा सविस्तर खुलासा केला आहे. तसेच या पत्रातून क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने स्वतः ड्रग्ज नेल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. यामध्ये त्यांनी क्रूझवर एनसीबीच्या पथकाने कशापद्धतीने ड्रग्ज नेले आणि कारवाई केली, याचा खुलासा केला आहे.

पंचनामे एनसीबी मुंबईच्या ऑफिसमध्ये लिहिले गेले

पुढे स्पेशल २६ पत्रात म्हटले आहे की, ‘गेल्या महिन्याभरापासून समीर वानखेडे भाजपच्या दोन कार्यकर्त्यांच्या (किरण गोसावी आणि मनिष भानूशाली) संपर्कात आहेत. क्रूझमध्ये जितके लोकं पडकले गेले होते त्यांना एनसीबी ऑफिसमध्ये आले होते आणि सर्व पंचनामे एनसीबीच्या ऑफिसमध्ये बसून तयार केले होते. परंतु रिशब सचदेव, प्रतिक गाबा आणि अमिर फर्नीचरवाला यांना त्याच रात्री दिल्लीतून फोन आल्यानंतर सोडून दिले. याप्रकरणात समीर वानखेडे यांची फोन कॉल डिटेल चेक केली जात आहे.’

साथीदारसोबत ड्रग्ज प्लॅन केले होते

‘याप्रकरणातील अरबाज मर्चंटचा मित्र अब्दुलकडून काहीच ड्रग्ज मिळाले नव्हते, परंतु समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून त्याच्याकडे ड्रग्ज मिळाल्याचे सांगितले गेले. समीर वानखेडे यांनी एनसीबी कार्यलयातील त्यांचे ड्रायव्हर विजय यांना पंच म्हणजेच साक्षीदार बनवले आहे. कायद्याद्वारे म्हटले जाते की, साक्षीदार स्वतंत्र असले पाहिजेत. हे संपूर्ण प्रकरण बनावट असून समीर यांनी त्यांच्या साथीदारसोबत ड्रग्ज प्लॅन केले होते,’ असा मोठा आरोप नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब, पोलीस बदलीच्या रॅकेटचा मांडला तपशील डेटा!

News Desk

राज्यपाल भवन राजकीय अड्डा झाला नवाब मलिक यांचा आरोप!

News Desk

चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

News Desk