HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ऑल द बेस्ट ! आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात

HSC Exam

मुंबई | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वीची परीक्षा आजपासून (१८ फेब्रुवारी) सुरु होत आहे.  या वर्षी ९ विभागीय मंडळातून १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च असा १२ वीच्या परीक्षेचा कार्यकाळ असणार आहे.  

बारावीच्या परीक्षेसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळातून एकूण १५,५०२७  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. या परीक्षेसाठी विज्ञान शाखेतील ५,८५,७३६ विद्यार्थी, कला शाखेतून ४,७५,१३४विद्यार्थी,  आणि वाणिज्य शाखेतून ३,८६,७८४विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ५७,३७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी ९,९२३ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून संपूर्ण राज्यात ३,०३६परीक्षा केंद्रे आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सवलत 

यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी दिली आहे. तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच गणित, कला आणि विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केला आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी अनेक विषयांच्या पेपरमध्ये एक दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.

राज्यात २७३ भरारी पथके 

परीक्षा काळात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळातर्फे राज्यात भरारी पथके नेमण्यात येतात. यंदाच्या वर्षी २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित असणे बंधनकारक असून काही कारणामुळे परीक्षेला उपस्थित न राहू शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १९ आणि २९ मार्चला घेतली जाणार  असल्याची माहिती आहे. या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट विसरले तरी घाबरायचे कारण नाही. कारण यावेळी ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असून त्यावर इंग्रजीसोबत मराठीतूनही सूचना दिल्या गेल्या आहेत. 

 

Related posts

मुख्यमंत्री महोदय आम्हाला काहीही वाईट बोला; पण शेतक-यांना कर्जमाफी द्याः खा. अशोक चव्हाण

News Desk

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता आरक्षण द्यावे

२०१९ साल संपण्यापूर्वी राम मंदिराचे काम सुरू करावे !

News Desk