HW News Marathi
देश / विदेश

आंतरराष्ट्रीय वेबसाईट्सना जगभरात Error, ‘या’ साईट्स ओपनच होईनात…

नवी दिल्ली | परदेशी वृत्तसंस्थांच्या तसंच इतरही काही आंतरराष्ट्रीय वेबसाईट्स काही काळ बंद पडल्या आहेत. द न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल या साईट्सवर गेल्यावर तिथे सारखीच एरर दाखवत आहे. या साईट्स ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास 503 ही एरर दाखवत आहेत.

कोणत्या वेबसाईट्स बंद पडल्या?

ब्रिटीश सरकारची जीओव्ही डॉट युके

गार्डीयन

फायनॅन्शियल एक्सप्रेस

इंडिपेंडंट

न्यू यॉर्क टाइम्स

रेडिट

अॅमेझॉन

सीएनन

फॅनडम

हुलूलू

ट्विचअप

द वॉशिंग्टन पोस्ट,

वॉल स्ट्रिट जर्नल

ट्विटर

पे पल

स्पॉटीफाय

ई बे

गीट हब

पीनस्ट्रेस्ट

स्वेअरस्पेस

यातल्या काही साईट्स हळूहळू ओपन होऊ लागल्या आहेत. मात्र काही साईट्स अजूनही बंदच आहेत. ही एरर कशामुळे आली आहे याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही.

आयकर विभागाची नवी वेबसाईट ‘क्रॅश’, सीतारामननी इन्फोसिस, निलेकनींचा ट्विटरवर क्लास घेतला

मोठा गाजावाजा करून आणि सहा दिवस सर्व्हर बंद ठेवून आयकर विभागाची नवीन वेबसाईट सोमवारी रात्री लाँच करण्यात आली. मात्र, करदात्यांनी ही वेबसाईट क्रॅश होत असल्याचे फोटो ट्विटरवर टाकल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरच इन्फोसिस आणि कंपनीचे सह संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकनींना चांगलेच सुनावले आहे.

ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 8.45 मिनिटांनी लाँच करण्यात आले. या नव्या वेबसाईटवर आयकर विभागाने वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत. यामध्ये तुमचा पॅन नंबर टाकल्यानंतर तुमच्या अकाऊंटला तुमची सारी माहिती आपोआपच लोड होणार आहे. अशा अनेक सुविधा या वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. मात्र, ही वेबसाईटच सुरु होण्यास समस्या येऊ लागल्याने अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तक्रार केली होती.

यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत चांगलेच सुनावले आहे. त्यांनी अशाप्रकारची असुविधा पुन्हा करदात्यांना होता नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. करदात्यांना चांगली सेवा देणे आपली प्राथमिकता असायला हवी, असे त्या म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

सकाळचा नाष्टा गडकरींच्या घरी; एकनाथ खडसे, रक्षा खडसे गडरींच्या भेटीला

News Desk

ट्रायकडून ग्राहकांना चॅनेल्स निवडीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

News Desk