HW News Marathi
Covid-19

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, पिंपरी चिंचवडमध्ये ‘हॉटस्पॉट’ भागात नागरिक रस्त्यावर

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार केंद्र, राज्य सरकारकडून नागरिकांना सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळण्याचा सूचना केल्या जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे तीन-तेरा वाजले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये हॉटस्पॉट असलेल्या आनंदनगर भागात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडल्याने आज (२० मे) शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे घटना घडली आहे. या परिसरात आतापर्यंत तब्बल 30 हून अधिक कोरोनाबाधित आढळून आल्याने हा परिसर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील आनंदनगर परिसरातील लोकसंख्या तब्बल १० हजारांहुन अधिक आहे. त्यातच ३० हुन अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याने हा संपूर्ण परिसर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून सील करण्यात आला. हा परिसर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र, या परिसरात राहणाऱ्यांना नागरिकांना योग्य वेळी आवश्यक त्या वस्तू पुरविल्या न गेल्याने संयम सुटलेल्या नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र, नागरिकांच्या या अशा वागणुकीमुळे आता येथील सोशल-डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचा मात्र फज्जा उडाला आहे. महापालिका प्रशासनाच्या कारभारावर देखील आता प्रशचिन्ह उपस्थित झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करोनाची तिसरी लाट; पुढील तीन महिने महत्त्वाचे, केंद्राचे राज्यांना तयार राहण्याचे निर्देश

News Desk

बीडमध्ये तिहेरी हत्याकांड ! आईसह दोन मुलांचा निर्घृण हत्या

News Desk

ईडीच्या ५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

News Desk