HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : अमोल कोल्हेंनी लॉकडाऊनमध्ये नैराश्य आलेल्यांचे असे वाढवले मनोधैर्य

मुंबई | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रत कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. या सारख्या सर्व विषयांवर खासदार अमोल कोल्हे यांनी आज (१६ एप्रिल) एच. डब्ल्यू. मराठीशी खास बातचीत केली आहे. एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांची गप्पा मारताना खासदर अमोल कोल्हे यांनी आवर्जुन एक गोष्टीचा उल्लेख केली. “ते म्हणजे या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी, नोकरदार आणि अर्थव्यवस्था याबाबत अनेकांना नैराश्य आले आहे. पुन्हा एकदा उमेदीने, जिद्दीने पुन्हा एकदा भिडू. त्यामुळे निराश होऊ नका, लढणे हा आपला स्थायी स्वभाव आहे,” असे आवाहन राज्यातील जनतेला एच. डब्ल्यू. मराठीच्या माध्यमातून दिली.

अमोल कोल्हे यांना काल (१५ एप्रिल) एका तरुणांचा फोन आला होता. एमपीएसी विद्यार्थ्यांचा त्यांना फोन आला होता. तो तरुण म्हणाल की, मला यंदा एमपीएसची परिक्षा देता येत नाही. मला आत्महत्या करावी, असे वाटते. या लॉकडाऊनमध्ये काही तरुणांना नैराश्य येत आहे. यावेळी विद्यार्थी, नोकरी करणारे किंवा भविष्याच्या दृष्टीने अर्थकारणाच्या यांच्या नैराश्य येत असेल त्यांना फक्त एकच गोष्ट सांगतो की, हेही दिवस जातील, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी एच. डब्ल्यूय. मराठी बोलता केले आहे.

यावेळी अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक उदाहरण दिले. ते म्हणाले, “शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेड्यात १३२ दिवस आडकले होते. आग्रच्या कैदेत ८० दिवस आणि महाराणी येसूबाई राणीसाहेब २८ वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होत्या. ऐवढे सर्व असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे स्वराज्य तडीस नेहले. औरंगजेबाज्याच्या कैदेतून आल्यानंतर महाराणी येसूबाई यांनी आपल्या पुत्रास पुन्हा गादीवर बसवले. जर हिंम्मत असेल जर लढण्याची उमेद कायम ठेवली. तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते,” असे म्हणत अमोल कोल्हे यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या माध्यमातून नैराश्य येणाऱ्या सर्वांचे मनोधैर्य उचविण्याचा प्रत्नय केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात आपण पॉझिटिव्ही होऊ

तसेच एका पूजेनें देव म्हातारा होत नाही पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाची काळजी वाटेत त्या एकच अटेम्ट अजून झाले असे समजू. पुन्हा एकदा उमेदीने, जिद्दीने पुन्हा एकदा भिडू. त्यामुळे निराश होऊ नका, लढणे हा आपला स्थायी स्वभाव आहे. भीतीला पाठ लागल्यानंतर आल्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे शस्त्र टाकणे, जिद्दीने लढा, जो शस्त्र टाकतो. त्याला पाराभव स्विकारावा लागतो. आणि जो जिद्दीने लढातो. त्यांच्यामध्ये नक्कीच जिंकण्याची ५० टक्के तरी ही शक्यता आपण घेऊ. यात पुन्हा पॉझिटिव्हवेनी या लॉकडाऊनचा सामना करू यात, असी कळकळीची विनंत एच. डब्ल्यू. मरीठीशी बोलतना अमोल कोल्हे यांनी राज्यातील जनतेला केली आहे.

संपूर्ण मुलाखत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक

News Desk

राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे !

News Desk

संजय राऊत आणि निवडणूकीचा काहीही संबंध नाही, निलेश राणेंचा प्रहार

News Desk