HW Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : कोरोनाशी झुंज देणाऱ्या त्या कोरोनामुक्त लढवय्यांचा प्रवास

महाराष्ट्रामधील पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. या दोन्ही दाम्पत्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयातून रुग्णवाहिनीमधून घरी सोडण्यात आले. हे दोन्ही दाम्पत्य आता ठणठणीत आहेत. मात्र, तरीही या दाम्पत्यायंना पुढील काही दिवस डॉक्टरांनी होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे. मात्र, या कोरोनाग्रस्त दाम्पत्यांचा कोरोनामुक्तीचा प्रवास कसा होता, हे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

या कोरोनामुक्त प्रवासाची कथा त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांना सांगितली. यावेळी या दाम्पत्यांनी  कोरोनाशी कशी झुंज दिली. यांना त्यांच्या  नातेवाईक, मित्र आणि समाजाकडून कशाप्रकारे वागणुक दिली. याबद्दल त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांच्या गप्पांमध्ये यांचा उलघडा केला आहे. कोरोनाशी झुंज देणाऱ्या त्या दोघांनी सांगितले की, मी आणि माझी पत्नी आमच्या लग्नाच्या वाढदिवसानंतर कुटुंबासोबत २४ ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबई फिरण्यासाठी गेलो होतो. यानंतर आम्ही १ मार्च रोजी मायदेशी परतल्यानंतर एक-दोन दिवसात मला ताप येऊ लागला. मी यानंतर आमच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केल्यानंतर त्यांनी माझे रिपोर्ट पाहिले. आणि माझ्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याचे सांगितले. यानंतर मी स्वत: पुण्यातील नायडू रुग्णालयात जाणून चाचणी केली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली असून माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. यामुळे मला तात्काळ डॉक्टरांनी क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार  असल्याचे सांगितले. जेव्हा आम्हाला कोरोना असल्याचे कळाले तेव्हा आम्हाला धक्का बसला. मात्र, डॉक्टरांनी आम्हाला विश्वासात घेऊन कोरोनाबद्दल माहिती दिली. तुमच्यात कोरोनाचे  प्राथमिक लक्षण दिसत आहे. तुम्ही यातून बरे होऊ शकता असा विश्वासही डॉक्टरांनी आम्हाला दिला. त्यामुळे तुम्हाला रुग्णालयात राहावे लागणार असल्याचे  त्यांनी असे एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरेशी बोलताना सांगितले.

दरम्यान, नायडू रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्ही राज्यातील पहिले कोरोना रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकाला दिल्याचे त्यांनी मला सांगितले. मात्र, यानंतर पुणे आरोग्य विभागातील लोकांनी संवाद साधताना त्यांना मी दुबईवरून आल्यानंतर कुठे कुठे गेलो, कोणाकोणला भेटलो, मला कोण भेटले त्या सर्व व्यक्तींची यादी बनवली. आणि त्या सर्वांना बोलावून घेतले. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली. मात्र, माझी पत्नी आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. परंतु माझ्या मुलाची कोरोना चाचणी ननिगेटिव्ह आली. तसेच आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आमच्या संपर्कात आलेल्या  सर्वांना तपासणी साठी बोलावले. त्या सर्वांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ही आल्याने आम्हाला खूप आनंद झाला.

या दाम्पत्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे गैरसमज पसरल्याबद्दल एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, कोरोनामुक्त व्यक्ती म्हणाले की, आम्हाला प्रसार माध्यमांद्वारे आमच्याबदद्ल समाजात जे समज आणि गैरसमज पसरत होते ते वेळोवेळी कळाले. माझे नातेवाईक आणि मित्रांनी या संकट प्रसंगी माझी साथ दिली त्याबद्दल एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना त्यांनी आभार देखील मानले. आम्हाला जेव्हा कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले तेव्हा मी विचार करू लागलो की, मी कोणत्याही कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलो नाही तरी मला कशी लागण झाली. मात्र, त्यावेळी मला डॉक्टारांनी मला कोरोना बद्दल माहिती दिली. तेव्हा मला कोरोनाची भीषणता समजली असल्याचे त्यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले.

सरकारने दिलेल्या  सूचनांचे पालन करण्याची केली विनंती

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचार बंदी लागू केली आहे. तर सरकारकडून वेळोवेळी घरात राहा, असे आवाहन करून तुम्ही जर बाहेर जात असाल तर तुम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालत  कोरोना मुक्त व्यक्तींनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगतिले. तुम्ही लक्षात घ्या की, केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन आणि संचारबंदीचे जो काही निर्णय घेतला आहे. तो आपल्यासाठी घेतला आहे. यामुळे तुम्ही सरकारच्या नियमाचे पालन करा, कारण हे नियम सुरक्षिततेसाठी लावले आहे. सार्वजनिक ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला माहिती नसते की, तुमच्यासोबत उभा असलेला व्यक्ताला कोरोनाची लागण आहे, त्या व्यक्तींच्या अजानतेपणे तुम्हाला चुकून कोरोनाची लागण होऊ शकते, ही तुमच्यामुळे इतरांनाही कोरोनाची बाधा होऊ शकते. मला माहिती नव्हते, त्यामुळे माझ्यावर ही वेळी आली, ती वेळे तुमच्यावर येऊ देऊ नये, असा सल्ला कोरोनामुक्तांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना दिला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमाचे पालन करा, अशी विनंती त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या माध्यमातून राज्यासह देशभरातील तमाम जनतेला केली आहे.

तुम्ही माध्यमांसमोर कधी येणार असा, प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी विचारल्यावर ते म्हणाले की, आम्हाला डॉक्टरांनी पुढील १४ दिवस  होम क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमाचे पालन करणार आहोत. यानंतर डॉक्टरांच्या सल्लानंतर आम्ही नातेवाईक, मित्रांना भेटणार आहोत. यानंतर मी सर्वांसमोर येणार असल्याचे कोरोनामुक्तांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

 

Related posts

दिशाहीन काँग्रेससोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार !

News Desk

कोल्हापूरमध्ये ‘ईद’ला बकरी न कापण्याचा मुस्लीम बांधव निर्णय, पूरग्रस्तांना करणार मदत

News Desk

सत्तेसाठी शिवसेनेने सगळी तत्वे गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली !

News Desk