HW News Marathi
Covid-19

HW Exclusive | कोरोना रुग्ण लपविण्यासाठी बीएमसी अन् राज्य सरकारचे हे मोठे षडयंत्र, तावडेंचा आरोप

मुंबई | मुंबई महानगरपालिकेकडून आता कोरोना चाचणीसंदर्भात एक मोठा बदल करत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मनपाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, “कोणत्याही रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट हा आता थेट त्या संबंधित टेस्टिंग लॅबकडून रुग्णाला देण्यात येणार नाही. तर संबंधित टेस्टिंग लॅबला तो रिपोर्ट प्रथम केवळ मुंबई महानगरपालिकेला द्यावा लागेल. त्यानंतर महानगरपालिका तो रिपोर्ट संबंधित रुग्णापर्यंत पोहोचवले.” म्हणजेच आता मुंबईतील कोणत्याही टेस्टिंग लॅबला कोरोना टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट हा थेट संबंधित रुग्णाला देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महानगरपालिकेच्या या निर्णयानंतर आता याविरोधी प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. एच.डब्ल्यू.मराठीने याच पार्श्वभूमीवर आज (१७ जून) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी बातचीत केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या.

कोरोनाचे रुग्ण लपविण्यासाठी बीएमसी अन् राज्य सरकारचे हे षडयंत्र !

“आपला रिपोर्ट जाणून घेण्याचा प्रत्येक रुग्णाला अधिकार आहे. मुंबई महानगरपालिका तितकीशी कार्यक्षम नसल्याने त्यांच्याकडून येऊन तो संबंधित रुग्णाला समजेपर्यंत त्या रुग्णाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे. आपली इभ्रत वाचविण्यासाठी रुग्णाचा जीव धोक्यात घालण्या हा प्रकार आहे. असे बिलकुल करता कामा नये. संबंधित रुग्णाच्या रिपोर्टची एक कॉपी महानगरपालिका तर एक कॉपी रुग्णाला अशी एकाच वेळी जायला हवी. हा प्रत्येकाचा अत्यंत मूलभूत अधिकार आहे. हा निर्णय न्यायालयातही टिकणार नाही. हे केवळ कोरोनाचे रुग्ण लपविण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारचे मोठे षडयंत्र आहे”, असा गंभीर आरोप भाजप नेते विनोद तावडे यांनी एच.डब्ल्यू.शी बोलताना केला आहे.

‘कोरोना’ मृत्यू लपविल्याची टीका तथ्यहीन, ही सगळी बिनकामाची लोकं !

“मुंबई महानगरपालिकाचा हा निर्णय काही नवीन नाही. आधीपासूनच आधी महानगरपालिकाच कळवते आणि त्यानंतरच रिपोर्ट दिला जातो. मुळात विरोधकांचा एक एक डाव आता फसत चालला आहे. काल त्यांनी आमच्यावर असे आरोप केले कि आम्ही कोरोनाचे मृत्यू लपविले. मोजण्यामध्ये, कामाच्या गर्दीत ती चूक झाली असेल, मात्र त्या डेथ सर्टिफिकेट्समध्ये स्पष्टपणे कोवीड-१९ असा उल्लेख करण्यात आला आहे. आम्ही ती चूक मान्यही केली. पण, आम्ही आरोप ऐकून घेणार नाही. सध्या ही टीका करणारी सगळी मंडळी घरात बसलेली बिनकामाची लोकं, नुसते घरात बसून ट्विट करणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून महाराष्ट्रात लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत!,आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

News Desk

राज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच मिळणार,एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्याचा निर्णय

Arati More

…तर चंद्रकांत पाटील अन् फडणवीसांनी इगतपुरीला जाऊन विपश्यना करावी !

News Desk