HW News Marathi
Covid-19

HW Exclusive | MPSC च्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू !

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अगदी सर्वसामान्यांपासून देशातील-राज्यातील नेतेमंडळींपर्यंत सर्वच जण सध्या घरातून काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, एच.डब्ल्यू.मराठी अशा नेतेमंडळींशी व्हिडीओ इंटरव्ह्यूच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या कामांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एच.डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी आज युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याशी बातचीत केली आहे. यावेळी कोटा येथे अडकले विद्यार्थी, नवोदयचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे एमपीएससी-युपीएससीच्या परीक्षांच्या तयारीसाठी अडकलेले विद्यार्थी विशेषतः पुण्यात अडकलेले एमपीएससीचे विद्यार्थी यांच्यासंदर्भात काय निर्णय झाले आहेत ? याबाबतची माहिती सत्यजित तांबे यांनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना दिली आहे.

पुण्यातील MPSCच्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करू !

“युवक काँग्रेसने सर्वप्रथम पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर कर्फ्यू सुरु झाल्याने आम्हाला जेवणाची व्यवस्था करणे त्यापुढे शक्य होऊ शकले नाही. त्यानंतर, रेंटवर राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडून घरमालकांनी भाडं मागू नये यासाठी आम्ही ताबडतोब राज्य शासनाकडून पत्र काढले. त्यानंतरही जर कोणत्या मुला-मुलीला घरमालक त्रास देत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना योग्य समज देऊ. आम्ही त्यांना या सर्व मदती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र त्यांना घरीच जायचे आहे. त्याचप्रमाणे, येत्या ३ ते ४ दिवसांत पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातही आपण निर्णय घेऊ”, असा विश्वास सत्यजित तांबे यांनी दिला आहे.

“पुणे हे सध्या कोरोनाचं हॉटस्पॉट शहर आहे. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावच्या घरी सोडायचं म्हणजे संसर्ग तर वाढणार नाही ना ? यासाठीची देखील खबरदारी घ्यावी लागेल. नाहीतर करायला गेलो एक आणि व्हायचं एक. त्यामुळे या सगळ्याचा विचार करावा लागेल. त्यातही प्रक्रिया आहे कि अल्पवयीन मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना यात प्राधान्य अधिक दिले जाते. त्याचाही विचार करावा लागेल. त्यामुळे हा काळजीपूर्वक घ्यायचा निर्णय आहे. युवक काँग्रेस याचा पाठपुरावा करतच राहील. त्याचप्रमाणे, तिथल्या मुलांना काहीही अडचण असेल तर तुमची आमच्याशी संपर्क साधा. घरी जाण्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. मात्र, तुम्हाला घरी पोहोचवण्यासाठीही प्रयत्न करू”, असे सत्यजित तांबे यांनी एच.डब्लू. मराठीशी बोलताना सांगितले.

राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याची प्रक्रिया काय ?

“ज्या पालकांची स्वतः गाड्या नेऊन आपल्या मुलांना आणण्याची तयारी आहे. त्यांना शासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटला जाऊन अप्लिकेशन केले आणि सगळी कागदपत्रे दाखवली कि त्यांना परवानगी दिली जाते. ते कोट्याला जाऊन आपल्या मुलांना घेऊन येऊ शकतात. मात्र, ज्यांची अशी कुठीलीही व्यवस्था नाही अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून विशेष बसेसची सोय करता येईल का ? यासाठी प्रयत्न सुरु आहे. माझी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा झाली आहे. वडेट्टीवार यांची देखील अनिल परब यांच्याशी चर्चा झालेली आहे. काही बसेस आपण आज-उद्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था करत आहोत”, अशी माहिती सत्यजित तांबे यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंदाची बातमी! संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत दिली जाणार – डॉ.हर्षवर्धन

News Desk

केंद्र सरकारने दिलेल्या कार्यक्रमानुसार राज्य सरकारकडून लसीकरणाचं प्रशिक्षण पूर्ण- राजेश टोपे

News Desk

कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी!

News Desk