HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सिल्लोड येथील  काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल अर्धा तास चर्चा केली. या भेटीनंतर सत्तार हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सत्तार यांचा भाजपमधील पक्षप्रवेश लांबल्याने त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आगामी तीन महिन्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत.

दोन्ही नेत्यांची चर्चा झाली की माझा निकाल लागेल. मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही. मला निवडणूक तर लढवायचीच आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांना दिली. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्जही मागे घेतला होता. मात्र पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

शिवसेना-भाजपची युती असल्याने दोन्ही नेत्यांशी चर्चा करावी लागले. टरबुजा सुरीवर पडला काय, आणि सुरी टरबुज्यावर पडली काय, टरबुजा तर कापणारच. म्हणजे शिवसेनेत गेलो काय आणि भाजपात गेलो काय, मला तिकीट मिळणारच आहे, नाही तर अपक्ष लढू, असेही अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

Related posts

आम्हाला आघाडीत घेण्याचा प्रयत्न हा केवळ त्यांचा दिखावा !

News Desk

नोकरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक

News Desk

स्वारातीम विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. रमजान मुलानी

News Desk