HW News Marathi
महाराष्ट्र

मला काय मिळेल याची मला चिंता नाही, दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार! – पंकजा मुंडे

बीड | “मला काय मिळेल यांची मला अजिबात चिंता नाही. पण, दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेचे संस्कार आहेत,” असे म्हणत अप्रत्यक्षरित्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी आपली दावेदारी केली आहे. पंकजा मुंडेंनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (३ जून) आठवा स्मृतिदिना निमिताने बीड येथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राज्यात विधान परिषदेची निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचे नाव राजकीय वर्तुळा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचे हे विधान राजकीय दृष्या अत्यंत महत्वाचे मानले जाते. 

पंकजा मुंडे म्हणाले, “मला सगळे विचारतात तुमचे काय भविष्य आहे. उद्या काय होणार आहे. तुम्हाला काय मिळणार आहे. या सर्वांची मला खरेच चिंता नाही. मला याची अजिबात चिंता नाही. दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचे सुद्धा मला सोने करता आले. याच्या एवढी पुण्याई कोणाकडे आहे. हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला शिवराज्यसिंग सारख्या सरळ स्वभावाच्या, सात्विक, एवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला खूप शिकवून गेला. तिथून शिकून तुमच्या सेवेसाठी मी अविरत काम करणार आहे. मी तुम्हाला एवढच सांगेन की या मंचावर बसणारा कोणी असेल, ते आपले भविष्य घडवू शकत नाहीत, ते तुम्ही आहात. एखाद्याचे भविष्य घडवू आणि बिघडवू शकणारे. ते तुमच्याच हातात आहे. जगात चांगल्या मानसाला चांगले म्हणे आणि वाईट मानसाला वाईट म्हणणे. आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळणार याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जे आहे ते कसे आपल्याला बांधून ठेवता येईल. आपल्याला काय मिळेल आणि काय नाही याची चिंता करण्याची अवश्यकता नाही. आपल्याला जे आहे ते कसे आपल्याला बांधून ठेवता येईल. कसा महाराष्ट्रातील एक एक माणूस मुंडेसैनिक म्हणून कामाला लागेल. हे आपल्याला इथून पुढे करायचे आहे.” 

“संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय ठेवून मी ठाम उभी राहीन, एवढी ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. सोसेल तुमचे वर्मी घाव तरी मी घायाळ होणार नाही, छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजातील वंचितांसाठी लढण्यासाठी मी उभी राहीन, तुम्हाला कसे ते कळणार देखील नाही”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अजित पवार भेसळ करायला लागले असं व्हायचं…” उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला त्या बंद केलेल्या पेट्रोल पंपचा किस्सा

News Desk

प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान!

News Desk

एल्गार परिषद प्रकरण : एनआयएकडे तपास सुपूर्त करण्याबाबत आज होणार सुनावणी

swarit