मुंबई। “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांतरा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांचे ट्वीट करत कौतुक केले. गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या कारवाईत तीन पोलीस जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले आहे.
“आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे” – गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री @Dwalsepatil यांच्याकडून प्रशंसा. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त. pic.twitter.com/kTnc6HSQfU
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 13, 2021
ट्वीटमध्ये काय म्हटलंय?
“आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे”, असं म्हणत गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून कौतुक करण्यात आलं आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं. त्याचसोबत, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.