HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राला वाचविण्यासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे | मुख्यमंत्री

मुंबई | “मी टीकेचा धनी होईल, महाराष्ट्राला वाचविण्यासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे,” अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. राज्यात चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे आज (१८ मे) संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात १९ हजार ९०० पर्यंत रुग्ण असले तरी ५००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होत आहेत ही चांगली बाब आहे. जर लॉकडाऊन उठवले तर अमेरिका, इटलीसारखी स्थिती होईल. मला महाराष्ट्रात ती परिस्थिती उद्भवू द्यायची नाही. त्यामुळे, मी लॉकडाऊन वाढवल्याचे,” असे त्यांनी राज्यातील जनतेला सांगितले.

“रेड झोनमध्ये उद्योग सुरू केले आणि उद्योगांमध्ये साथ पसरली तर कामगार निघून जातील आणि सगळे बंद करावे लागेल. मी माझ्या महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होण्यास तयार आहे. महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा घेण्यासाठी तयार, जेजे मला पटते ते मी महाराष्ट्र करणार म्हणजे करणार,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना मला सांगायचे आहे, तुम्ही आत्तापर्यंत सरकारचे ऐकून महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. आता, ग्रीनझोनमधील तरुणांना माझे आवाहन आहे. तरुणांनी उद्योग सुरु करण्यासाठी, उद्योगांना बळ देण्यासाठी पुढे यायला हवे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. मोदींजींच्या भाषेत सांगायचे झाला तर, आत्मनिर्भर व्हायचे आहे, असे म्हणत राज्यातील तरुणांना पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

 

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

  • कोरोनासोबत जगायला शिका म्हणतात. कसे जगायचे? घराबाहेर राहताना सावध राहा”

  • अजूनही कारण नसताना लोक बाहेर पडत आहेत. धार्मिक सणांना परवानगी नाही.

  • शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ शकत नाहीशाळांबद्दल विचार सुरू आहे.

  • हे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचंयआता जनजीवन आता रुळावर आणायचंय.

  • शाळा कॉलेज कसे सुरु करायचे याचा विचार सुरू, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ शकत नाही
  • कोरोनाचे संकट पावसाळ्यापूर्वी संपायलाच हवे
  • घराबाहेर जाताना सावध राहा असं आता म्हणायला लागेल
  • आपल्या गावी कोरोना घेऊन जावू नका, कोरोना विषाणूंचे वाहक तुम्ही होऊ नका
  • राज्यात ७०,००० उद्योगांना सुरु करण्यास परवानगी
  • राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनी सहकार्य करा
  • मजुरांनो घाई कशाला करताय? जेथे असाल तेथेच राहा. तुमच्यासाठी रेल्वे, बसची सुविधा करत आहोत: मुख्यमंत्री
  • हातावर पोट असणाऱ्या मजुरांना सरकारच्या खर्चाने पाठवतोयतुम्ही आपले आहेत, अस्वस्थ नका होऊ
  • परप्रांतीय मंजुरांनी चिंता करू नये, इतर राज्याशी चर्चा सुरू
  • राज्यातील कोरोनमुक्त होणाऱ्यांचा आकडाही मोठा
  • राज्यातील ५ लाख मजुरांना मोफत ट्रेन, बसने त्यांच्या राज्यात पाठविले
  • आरोग्य सुविधा आणि ॲम्बुलन्स वाढवण्यावर आमचा भर
  • मी टीकेचा धनी होण्यास तयार आहे, महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा घेण्यासाठी तयार, जेजे मला पटते ते मी महाराष्ट्र करणार म्हणजे करणार
  • ऑक्सिजन बेडची उपलब्ध करू देणार भर
  • आयसीयूमध्ये बेड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
  • बांद्रा, गोरेगाव, कुर्ला, वरळी, रेसकोर्स, ठाणे, मुलुंडमध्ये केअर सेंटर, राज्यात १,४२४ कोविड सेंटर
  • बीकेसीमध्ये आता १ हजार बेडचे कोविड सेंटर उभारले
  • महाराष्ट्ता आतापर्यंत ५ हजार रुग्ण बरे झाले आहे
  • ग्रीन झोनमधील भूमिपुत्रांनो आत्मनिर्भ व्हा
  • प्रदुषण न करणाऱ्या उद्योगांना कोणतीही अट नाही
  • नवीन उद्योगासाठी भाडे तत्वावर जीमीन देणार, उद्योगासाठी आण्यासाठी ४० हजार एकर राखीव
  • ग्रीन झोन आपल्याला कोरोना विरहित करणायचे आहे
  • ग्रीन झोनमध्ये निर्बंध आणखी शिथिल होणार
  • रेड झोनचे ग्रीन झोनमध्ये रुपायंतर करण्याच आवाहन
  • रेड झोनमध्ये निर्बंध शिथिल करणे योग्य ठरणार नाही
  • आतापर्यंत ७० लाख कामगार कामावर रुजू झाले
  • आतापर्यंत ५० हजार उद्योग सुरू झालेनवीन उद्योजकांसाठी विशेष धोरण
  • कुणालाही घरी डांबून ठेवण्यासारखी शिक्षा नाही. हा चक्रव्यूह कधी भेदणार, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही.
  • कोरोनाच्या वाढीमध्ये आपण गतिरोधक नक्कीच निर्माण केला आहे .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मद्यप्रेमींनी दुकानांसमोर सोशल डिस्टन्स पाळत लावली रांग

News Desk

काँग्रेसनं १०० वर्षे सत्तेत न येण्याचं ठरविलं!; पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर घाणाघात

Aprna

दिलासादायक : ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोविड-१९ च्या लसीबाबत एक आनंदाची बातमी

News Desk