HW News Marathi
महाराष्ट्र

मला आरोपी आणि सह आरोपी बनवता येईल असे प्रश्न विचारले! – देवेंद्र फडणवीस

मुंबई | “पोलीस बदली घोटाळ्या प्रकरणी मला आरोपी आणि सह आरोपी बनवता येईल, असे प्रश्न विचारले,” असा आरोप विधानसभा विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केला आहे. मुंबई पोलिसांनी आज (१३ मार्च) फडणवीसांच्या सागर निवासस्थानी दुपारी १२ वाजता चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी फडणवीसांची तब्बल दोन दास चौकशी केली आहे. फडणवीसांनी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. 

फडणवीस म्हणाले, “राज्यात पोलीस बदल्यांचा महाघोटाळा झाल्याची माहिती मी केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिला. आणि राज्य सरकारने पोलीस बदली घोटाळ्याचा अहवाल सहा महिने दाबून ठेवला होता. मला पोलिसांनी जे पाठविले प्रश्न पाठवले आणि जे प्रश्न विचारले यात फरक होता. या प्रकरणात मला आरोपी बनवता येईल, असे प्रश्न विचारले,” गोपनीय कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे मला प्रश्न विचारले, असा सवालही फडणवीसांनी राज्य सरकारवर केला केला आहे.

मी ट्रान्स्क्रिप्ट किंवा पेनड्राईव्ह कुणालाही देणार नाही. राज्य सरकार पोलीस बदली घोटाळा दाबण्याचा प्रयत्न करत होती. आणि मी तिच कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणे दिली. मी जे कागदपत्रे केंद्राला न देता राज्याला दिली असती तर त्यांनी काय दिवा लावले असते. मी संवेदनशील माहिती सार्वजनिक केली नाही. या उलट राज्य सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली आणि त्यांची चौकशी झाली पाहिजे. गोपनीय कागदपत्र होते तर यांची माहिती मलिकांना पत्रकारांना देण्याचे अधिकार होते का?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदेनी आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत केला सण साजरा!

News Desk

NIS विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aprna

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना

Aprna