HW News Marathi
महाराष्ट्र

मी नाराज नाही, मला स्वत:ला दिल्लीत काम करण्यात रस नव्हता !

पुणे | “मला स्वत:ला दिल्लीत काम करण्याचा रस नव्हता, मी राज्यात काम करण्यात रस होता,” अशी इच्छा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केली आहे. “मी कुठलेही नाराज नाही, मला डावलण्यात आलेले नाही. पक्षाचे सर्व निर्णय दिल्लीत घेतले जातात, ” असे काकडे म्हणाले. काकडे हे राज्यसभेत जाण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी गेल्या काही दिवसात पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यावेळी काकडेंनी उदयनराजे भोसले यांच्या टीका केली होती. दरम्यान, भाजपकडून उदयन राजे भोसले यांना काल (११ मार्च) उमेदवारी देण्यात आली. यापार्श्वभूमीवर संजय काकडेंनी आज (१२ मार्च) पत्रकार परिषदे बोलविली.

यावेळी काकडे म्हणाले की, “राज्यसभेची उमेदवारी दिली नाही, म्हणून मी दु:खी नाही, मला राज्यात काम करण्यात रस होता, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. मला स्वत: दिल्लीत काम करण्याचा रस नव्हता. दिल्लीत जाण्याची माझी इच्छाही नव्हीत आणि मला करमतही नव्हते, असे काकडेंनी स्पष्ट केले. उदयनराजेंना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आज (१२ मार्च) विधीमंडळात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे मला वाईट वाटले,” असे काकडे यावेळी म्हणाले.

संजय काकडेंनी उदयनराजेंवर अशी केली टीका

पत्रकार परिषदेत काकडे म्हणाले की, “‘मी यावेळी सहयोगी म्हणून नव्हे तर भाजपकडून इच्छुक आहे. पुणे महापालिका असेल किंवा विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाच्या जोरावर, मेरिटवर मला पक्ष उमेदवारी देईल याची मला १०० टक्के खात्री आहे,’ असे ते म्हणाले. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे. म्हणून ते सरस होई शकत नाही. पक्षाच्या दृष्टीने पाहिले तर उदयनराजेंपेक्षा मी जास्त कामे केली आहेत. पण जर ते महाराजांचे वंशज आहे तो निकष लावला तर आम्ही त्यांची बराबरी होऊ शकत नाही. पण आम्ही देखील सुभेदार आहोत. मात्र, उदयनराजे राष्ट्रवादीतून पक्षात आले आणि पडेल. त्यांचा त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आले नाही. हरलेल्या व्यक्तीला मंत्रीपद कसे मिळेल, असे सवाल काकडेंनी उपस्थित केला. काकडे पुढे म्हणाले की, उदयनराजेंना ८० वर्षांच्या व्यक्तीने पाडलं जे दहा वर्षं राजकारणात नव्हते. अशा श्रीनिवास पाटील यांनी पराभूत केले. माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मोदी आणि शाह. मी त्यांना म्हटले, की तुम्हीच माझ्या वतीने मोद शाहांना भेटा. मला फडणवीस डावलतील असे वाटते नाही, डावलल्यावर बघू, असेही काकडे यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे- मुख्यमंत्री

News Desk

शिवसेनेने नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजे! – संजय राऊत

Aprna

बड्या कार्पोरेटसच्या एनपीएची पुनर्रबांधणीला बँकांचा विरोध, उद्यापासून सर्व बँकांचा संप

News Desk