HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’वेळी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना पाटलांना पाहिले, थोरातांचा दावा

मुंबई। राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असताना कसे वागले हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना मी त्यांना पाहिले आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज ( जून १९ ) केला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर एक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यामुळे या कार्यक्रमात कोरोनाशी लढा देणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार आदींचा सत्कार मंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर थोरातांनी पत्रकार परिषद घेतली.

तसेच थोरातांनी या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले म्हणाले, ‘भाजपचे विद्यमान आमदार विखे-पाटलांनी राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना कोणीही विचारत नाही. ते कसे काय लाचारासारखे सत्तेत सहभागी आहेत, याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे. प्रदेशाध्यक्षांना कुणी विचारत नाही, अशी टीका थोरातांचे नाव न घेता केली.

राधाकृष्ण विखे – पाटील नेमके काय म्हणाले

भाजपचे विद्यमान आमदार विखे-पाटलांनी राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना कोणीही विचारत नाही. ते कसे काय लाचारासारखे सत्तेत सहभागी आहेत, याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे. प्रदेशाध्यक्षांना कुणी विचारत नाही, असे नाव न घेता विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना आणि सूचना

Aprna

कोल्हापूर विक्रीकर विभागाचे सह आयुक्त संजय माने यांना अटक

News Desk

“उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Aprna