HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राच्या राजकारणात मला घ्यावे, एकनाथ खडसेंनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली इच्छा !

मुंबई | राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा होती तसेच महाराष्ट्रातून माझ्या नावाची शिफारस महाराष्ट्र प्रदेश आणि केली होती . मात्र त्यावेळी मला राज्यसभेसाठी फारशी इच्छा नव्हती. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान परिषदेसाठी मला घ्यावे, अशी इच्छा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल विभागासह अकरा मंत्री पदाचा पदभार होता. मात्र भोसरी व दाऊद प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एकनाथ खडसे यांना आपल्या सर्व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र वरील दोन्ही प्रकरणात खडसेंना क्लिनचीट मिळाल्यावर देखील मंत्री मंडळात पुन्हा स्थान मिळाले नाही. तसेच विधानसभेतही पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने खडसेंची पक्षावर असलेली नाराजगी त्यांनी वारंवार व्यक्ती केली.

नुकत्याच राज्यसभेसाठी ही खडसें चे नाव चर्चेत होते मात्र उदयनराजे भोसले व रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने खडसेंना पुन्हा डावलण्यात आले. मात्र तरीदेखील खडसेंनी पक्ष बदल न करता पक्षनिष्ठा जोपासली . मात्र आता विधान परिषदेसाठी खडसेंनी आपली इच्छा व्यक्त केल्याने पक्ष नेमकी काय भूमिका घेतोय याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…अप्पा मला बळ द्या’, धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट!

News Desk

Corona World Update : जगभरात ३१ लाखांहून अधिकजणांना कोरोनाची लागण

News Desk

कोरोनाचे संकट जरी वाढले तरी सरकार पूर्णपणे तयार – केंद्रीय आरोग्यमंत्री

News Desk