HW News Marathi
Covid-19

Pravin Darekar HW Exclusive : मी माझ्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणार आहे !

मुंबई | राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदतीची गरज आहे. या पाश्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधी (पीएम फंड) राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी (सीएम फंड) याद्वारे देशातील जनते आर्थिक मदत करत कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील भाजप नेते पीएम फंडला मदतीवर राजकार केले जात आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी पीएम फंडला मदत केल्याचे दाखवत, राज्य सरकार हे त्यांच्या कामात कमी पडल्याचे लपवण्यासाठी राज्यातील जनतेचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विधान परिषदेतेच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना केला आहे. “मी माझ्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणार आहे,” अशी माहिती प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगिते आहे.

भाजपच्या नेत्यांनी पीएम केअर फंडला का मदत केली, प्रश्नावर उत्तर देताना प्रविण दरेकर म्हणाले, “राज्य सरकार हे त्यांच्या कामात कमी पडल्याचे लपवण्यासाठी राज्यातील जनतेचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकार भाजप नेत्यांनी पीएम फंडला मदत केल्याचा विषय मोठा करत आहे, असा आरोप त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राज्य सरकाने स्वतंत्र बँक खाते काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राज्यातील जनता देखील पुढे येऊन मदत करत आहे,” असेही प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. “मुख्यमंत्री सहाय्यता निधीला का पैस दिले यांचे स्पष्टी करण दिले आहे, असेही प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे. “मी माझ्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणार आहे. अनेक लोक ही सीएम फंडात मदत करत आहेत. मात्र, पीएम फंड आणि सीएम फंड यामागचे चित्र उभकरण्याचा प्रयत्न होतोय, हे आताच्या परिस्थितीला आपल्याला परवडण्यासारखा नाही,” असे मत प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना व्यक्त केले आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात सीएसआर कायद झाला आहे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीएसआरसंदर्भात केंद्राचा असणार कायदा आणि पीएम केअर फंड का?, पैसे दिले, यांचे सविस्तर विशेष केले आहे. सीएसआर हा कायदा केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना आला आहे. आणि सीएसआरचे पैसे हे केंद्राच्या पीएम फंडाला, असे तेव्हापासूनचे धोरण आहे. मग काँग्रेसच्या राजवटीत हा निर्णय झाला असेल. पुन्हा द्याच विषयावर आम्ही पीएम फंडाला देता आणि सीएम फंडाल का देत नाही? , असा दुजाभाव निर्माण केल्याचे भावल्याची काही गरज नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना राज्य सरकारवर केली आहे.

प्रविण दरेकर यांची संपूर्ण मुलाखत

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार उदयनराजे भोसलेंना कोरोनाची लागण!

News Desk

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी आणखी पाचजण अटकेत, सर्व आरोपींची १३ मेपर्यंत सीआयडी कोठडी

News Desk

यंदा आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नको | पडळकर

News Desk