HW News Marathi
महाराष्ट्र

तर मी मुंबई कायमची सोडून जाईन,कंगणाचं गृहमंत्री अनिल देशमुखांना चॅलेंज

मुंबई | ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिची चौकशी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (८ सप्टेंबर) विधानसभेत दिली. त्यानंतर आता कंगणाने गृहमंत्र्यांनाचं थेट टार्गेट केले आहे. कंगणाने ट्विट करत म्हटलंय की, “अनिल देशमुख,मुंबई पोलिस माझी ड्रग टेस्ट करा, माझ्या कॉल रेकॉर्डची तपासणी करा जर काही पुरावा सापडला तर माझ्या चुकीची कबुली देऊन मी मुंबई सोडून जाईन आणि मी तुम्हांला भेटायला उत्सुक आहे. ”

https://twitter.com/KanganaTeam/status/1303273355299045376?s=19

 

मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यावर उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता कंगणाची ड्रग्स प्रकरणात चौकशी होणार असून त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि कंगणाची भूमिका महत्वाची असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग २ सप्टेंबरपासून सुरु ! 

News Desk

सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प, पंकजा मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

News Desk

वर्षा राऊत यांना ११ जानेवारीला हजर राहण्यासाठी पुन्हा ईडीकडून समन्स

News Desk