HW News Marathi
महाराष्ट्र

मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, शंंभर टक्के मंत्री होणार !

मुंबई | “मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून शंंभर टक्के मंत्री होणार आहे”, असा दावा काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशास भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा नकार आहे. एकीकडे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सत्तार यांना भाजपमध्ये न घेण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार आपल्याला १०० टक्के मंत्रिपद मिळणार असा दावा करत आहेत.

काँग्रेसने औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी २३ मार्च रोजी मध्यरात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान सत्तार यांच्या मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. काँग्रेसकडून औरंगाबाद मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते.

अब्दुल सत्तार, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यात ३ एप्रिलला झालेल्या बैठकीमुळे सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांचे प्रमाण आणखी वाढले. त्यानंतर, २० एप्रिल रोजी पक्षाविरुद्ध भूमिका घेतल्याने अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील!

News Desk

डोंगरांतील गावांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करा, रामदास आठवलेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी!

News Desk

भारतात मुस्लिम नाही तर हिंदू व्होट बँक आहे अन् राहील, असदुद्दीन ओवैसींचे वक्तव्य

News Desk