मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हवरुन नागरिकांशी संवाद साधला. महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचार बंदी लागू केली होतीच. पण आता ही संचारबंदी १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात किराणा, मेडिकल, दवाखाने, पालीभाजा या सर्व अत्यावश्यक बाबींना सूट देण्यात आली आहे. त्यामूळे लोकांना अत्यावश्यक बाबी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज (२४ मार्च) छगन भुजबळांनीही सांगितले की आपल्याकडे ६ महिने पुरेल इतका अन्नधान्यांचा साठा आहे त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात रेशन कार्डावर तुम्ही २ महिन्यांचे सामान घेऊन जाऊ शकता अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, या वस्तू बाजारात घ्यायला जाताना किंवा आणताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे अत्यंत गरजेचे आहे हे आरोग्यमंत्र्यांनी निक्षून नागरिकांना सांगितले. धान्य, भाजीपाला या सगळ्यांसाठी एक नियमावली तयार करणार जेणेकरुन गर्दी होणार नाही. खाजगी डॉक्टरांनी दवाखाना बंद करु नयेत अशी विनंतीही आरोग्यमंत्र्यांनी केली.
सद्यस्थितीला अनेक अफवा येत आहेत की कोरोना बरा होण्यासाठी हा उपचार करा किंवा ही गोळी घ्या. तर अशा कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. चुकीच्या उपचारांवरही विश्वास ठेवू नका अशी विनंतीही त्यांनी केली. दरम्यान, भविष्यकाळात रक्ताची गरज लागू शकते असे राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यामूळे कलेक्टरांशी त्याबाबतीत बोलेण करत छोट्या प्रमाणात का होईना पण रकत्दान शिबिर भरवून लोकांनाही रक्तदान करा असे आवाहन त्यांनी केले.
सरकारकडे ६० दिवस पुरेल इतके रक्त आहे आणि कोरोनात रक्ताची गरज लागतेच असे नाही पण आपल्याकडे पुरेसा रक्तसाठा हवा त्यासाठी रक्तदानासारखे महत्त्वाचे काम तुम्ही करा असे आवाहनही हा माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी केले. WHO च्या सुचनेनुसार आपल्याकडे रक्तसाठा असणेही महत्त्वाचे आहे. त्यामूळे घाबरुन जाऊ नका आणि काहीही झाले तरी घरीच राहा असे नम्र आवाहन आणि विनंती राजेश टोपे यांनी नागरिकांना पुन्हा एकदा केली. तसेच, ‘मीच आहे माझा रक्षक’, हे ब्रीद घेऊन, ‘मी घरी बसणार, मी कोरोनाला हरवणार’ अशी जिद्द घेऊन आपण कोरोनाची ही लढाई विजयी करुयात असा विश्वासही आरोग्यमंत्र्यांनी राज्याच्या नागरिकांना दिला.