HW News Marathi
Covid-19

अवघ्या ४ दिवसांत सातारा पोलिसांसाठी उभारले ‘ICU व्हेंटिलेटर बेड’ हॉस्पिटल

सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सुविधा अधिकाधिक सक्षम बनविणे हे आपल्यापुढचे मोठे आव्हान आहे. योग्य वेळी, योग्य ते उपचार मिळणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मात्र, कोरोनाच्या इतक्या बिकट स्थितीत देखील सामान्यांच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस काम करणाऱ्या अनेक पोलिसांनाच ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा बळी ठरावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, आता सातारा पोलिसांनी अवघ्या ४ दिवसात पोलिसांसाठी ‘ICU व्हेंटिलेटर बेड’ची व्यवस्था असणारे हॉस्पिटल उभारले आहे. ऐनवेळी पोलिसांना बेड न मिळण्याच्या घटनेमुळे यापुढे पोलिसांना आपला जीव गमवावा लागू नये, यासाठी सातारा एसपी तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकाराने हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख या पुढाकाराबाबत प्रतिक्रिया देताना म्हणतात कि, “आज सातारा पोलीस दलाच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकाराने आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. मनोजकुमार लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित झाले. या उद्घाटनाला मी व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यासाठी राबलेल्या सर्वाचे आभार मानले. या कठीण काळात आमचे पोलीस दल आणि अधिकारी मेहनत घेत असताना असे नाविन्यपूर्ण उपक्रम करत आहेत याचा या खात्याचा प्रमुख या नात्याने मला अभिमान वाटतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचे पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील !

News Desk

११ लाख ९० हजार कामगारांची ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी

News Desk

पुण्यात लॅाकडाऊनची गरज नाही,महानगरपालिका न्यायालयात बाजू मांडणार!

News Desk