HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्युज – अजित पवार

पुणे | पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या २०० ऑक्सिजन बेडयुक्त रुग्णालयाचे आज (२८ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी “फडणवीस आणि मी दोघे एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज होते” अशा शब्दात अजित पवार यांनी टोलेबाजी केली.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार आहेत म्हणून. राजकीय भूमिका आणि मते वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळं विसरुन जावं” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

“गेल्या रविवारपासून हा तिसरा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभं केलं आहे, त्याचं अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असं होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे” असे अजित पवार म्हणाले.

“सिरम इन्स्टिट्यूटने भारती हॉस्पिटलमध्ये कोविडवरील लशीची मानवी चाचणी सुरु केली आहे” असे अजित पवार म्हणाले. खाजगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेकडून लेखा परीक्षण सुरु आहे. खाजगी रुग्णालयाने जास्त पैशाचा मलिदा काढण्याचा प्रयत्न करु नये” असा इशारा अजित पवारांनी दिला.

“आपण फिजिकल डिस्टन्स ठेवलं पाहिजे, मास्क वापरला पाहिजे. पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर परिसरात मास्क वापरला नाही तर १०० रुपये दंड आकारला पाहिजे” असे त्यांनी सांगितले. जुन्नर, खेड, आंबेगाव,शिरुर या ग्रामीण भागातील रुग्णदेखील जम्बो रुग्णालयात येतील. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव होणार नाही. हॉस्पिटलची भरभराट होऊ दे, असं बोलावंसं वाटत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

माझगाव डॉकमध्ये आयएनएस विशाखापट्टणमव युद्धनौकेवर भीषण आग

News Desk

मुंबईतील निर्बंधात शिथिलता; पहा काय आहेत नवे नियम

News Desk