मुंबई | “मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुम्ही फ्लॉप होणार,” असा खोचक टोला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या (१४ मे) शिवसंपर्क अभियाना अंतर्गत सभा केली होती. यात सभेत राज ठाकरेंचा ‘मुन्नाभाई’ उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत भाजप, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते किरीट सोमय्या, राणा दाम्पत्य, हिंदूत्व आदी मुद्यांवर सर्वांवर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यांनी आज (१५ मे) पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेचा खरपूस समाचार केला. मुख्यमंत्र्यांची सभा ही लाचार सभा होती, अशी टीका राणा दाम्पत्यांनी केला आहे.
नवनीत राणा म्हणाले, “मुन्नाभाईमध्ये काय घडले, स्वप्नात काय घडले. आणि यांच्या स्वप्नात बाळासाहेब ठाकरे येत आहे. स्वप्न हे खरे होत असतात. हे लक्ष्यात ठेवा. आणि हे स्वप्न खरे झाले तर ते सुपरहिट होईल, तुम्ही फ्लॉप होणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही फ्लॉप आहेच. आणि एम.बी. बी. एस जशी सुपरहिट झाली होती. तसेच जर यांचे स्वप्न सुपरहिट झाले. तर तुम्ही फ्लॉपमधूनन डिझास्टरमध्ये येणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्ष्यात ठेवली पाहिजे.”
उद्धव ठाकरेंनी सभेत राज ठाकरेंना नेमके काय म्हणाले
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला एका शिवसैनिकांनी विचारले की, तुम्ही लगे रोह मुन्नाभाई पाहिलात का?, मी म्हटले की त्याचा काय संबंध, म्हणे त्या सिनेमात संजय दत्तला गांधीजी दिसतात. मग,संजय दत्त हा गांधीगिरी करायला लागतो. त्यापैकीच एक केस आपल्याकडे आहे म्हटले?, मी म्हटले कोण, ते म्हणाले, ती नाही का, स्वत: ला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. ते शाल घेऊन फिरतात हल्ली. कधी मराठीच्या नादा आणि कधी हिंदुत्वाचा नादाला लागतात. पण, मी म्हटले की, मुन्नाभाई लोकांचे भले तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढला. मी म्हटले तुम्ही मुन्नाभाई सिनेमाचा शेवट बघितला नाही का?, यात संजय दत्तला कळते की, आपल्या भेज्यात केमिकल लोच्या झाला. ही केमिकल लोचाची केस असून हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. असे मुन्नाभाई फिरताना, फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचे तर जाऊ द्या. आदित्य पुन्हा चालला आहे. “
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.