HW News Marathi
महाराष्ट्र

‘फेक न्यूज’ दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द

नवी दिल्ली | खोट्या बातम्या म्हणजे ‘फेक न्यूज’ प्रसिद्ध केल्यास पत्रकारांची मान्यात कामय स्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. हा निर्णय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी आणि तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास पत्रकारांची कायमस्वरुपी मान्यता रद्द केली जाणार आहे.

प्रिंट मीडियासाठी फेक न्यूजबाबात प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) आणि टीव्हीवरील फेक न्यूजसाठी नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन (एनबीए) याकडे तक्रार करण्यात येईल. फेक न्यूज संदर्भात यंत्रणेकडे तक्रार दाखल झाल्यास पत्रकारांची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केली जाईल. ही चौकशी १५ दिवसात पूर्ण करावी असे या पत्रकात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅपे रिक्षातून पडून विद्यार्थ्यीनीचा मृत्यू

News Desk

शरद पवारांच्या हस्ते होणार तावडे अतिथी भवना” चे उदघाटन

News Desk

कृषिमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

News Desk