HW News Marathi
देश / विदेश

‘राजेशाही’ असती तर गोयलला दाखवलं असतं,उदयनराजेंची भाजप नेत्याला धमकी!

पुणे | छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्राात गदारोळ झाला. या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या पुस्तकाचा निषेध नोदवला तसेच त्यांनी पुस्तकाचे लेखक गोयल यांच्यावरसुद्धा टिकास्त्र सोडले.

पुण्यातील पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धोरणावर सडकुन टिका केली. फक्त स्वार्थासाठी शिवाजी महाराजांचा उपयोग केला जातो असा आरोप त्यांनी या पक्षांवर केला.

पत्रकार परिषदेनंतर उदयनराजे भोसले यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.ज्या पोस्टमध्ये त्यांनी आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकाचे लेखर जय भगवान गोयल यांना थेट धमकी दिली आहे. उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की,’लोकशाही आहे म्हणून शांत आहे, नाहीतर त्या लेखक गोयल ला दाखवलं असत राजेशाही काय असते.’ आपल्या पुस्तकातुन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या जय भगवान गोयल या भाजपच्या नेत्याला उदयनराजेंनी चांगलेचं ठणकावले आहे.

उदयनराजेंची फेसबुक पोस्ट

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Live Update | भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनासाठी राजपथ सज्ज

News Desk

अमित शहाच्या स्वागतासाठी बॉईक रॅलीमुळे वाहतूक कोंडी

swarit

चांद्रयान-२ : इतिहास रचण्यासाठी सज्ज

News Desk