HW News Marathi
महाराष्ट्र

जास्त बोललात तर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू! नवाब मलिकांना धमकी

मुंबई। क्रुझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा अडचणीत आला होता. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्या क्रुझ पार्टीवर छापा मारला आणि आर्यनला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. एकीकडे आर्यन खानला जामीन मिळाला तर दुसरीकडे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या.

त्यावरुनच आता नवाब मलिक हे शांत बसले नाहीत

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या तपासात गुंतले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी रविवारी समीर वानखेडे यांच्या घरी जात भेट घेतली. तत्पूर्वी, वानखेडे यांनी शनिवारी अरुण हलदर यांची भेट घेऊन त्यांच्यावरील धर्मांतराच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. या बैठकीनंतर आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले होते की, जर कोणी अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यावर जातीच्या आधारावर आरोप केले तर आयोग अशा प्रकरणी गप्प बसणार नाही. त्यावरुनच आता नवाब मलिक हे शांत बसले नाहीत. वानखेडे यांनी घेतलेल्या हलदर यांच्या भेटीवरून मलिकांनी टीका केली आहे.

ज्या व्यक्तीला तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या पदावर बसवले आहे ती व्यक्ती विभागाचे अधिकार स्वतःकडे घेत आहेत. याची आम्ही राष्ट्रपतींकडे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. ज्या व्यक्तीने बनावट प्रमाणपत्र बनवून एका मागासवर्गीयाचे अधिकार हिरावून घेतले. त्यांनी मला धमकी दिली आहे. जास्त बोललात तर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू. ते जास्त बोलत आहेत. जी व्यक्ती दलित नाही त्यावरून मला घाबरवण्याचे काम करत आहात. सर्वानी मर्यादेत राहायला हवं. आपल्या पदाची प्रतिष्ठा राखायला हवी. त्यांचा अधिकार हिरावून घेऊ नये. आम्ही याची तक्रार करणार आहोत, असे नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिन्ही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे राज्यातील उस्मानाबाद जिल्हा झाला ‘कोरोनामुक्त’

News Desk

शाळांमध्ये ‘या’ तारखेला आजी आजोबा दिवस साजरा होणार; दीपक केसरकरांची माहिती

Aprna

महाविकासआघाडीच्या नेत्यांचे आज ED विरोधात आंदोलन

Aprna