HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर…!

मुंबई | “जर कोणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असेल तर आम्ही तिथेही लढण्यासाठी तयार आहोत”, असे विधान काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केले आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी (२७ जून) मराठा समाजाला दिले गेलेले आरक्षण हे वैधच आहे, असा निर्णय दिला आहे. तसेच उच्च न्यायालायने मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्धच्या सर्व याचिका देखील फेटाळून लावल्या. त्यामुळे आता या याचिकाकर्त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर, नितेश राणे यांनी हे विधान केले आहे.

“कालच्या निकालाच्या विरूध कोण सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल..तर आम्ही तिथे ही लढण्यासाठी तयार आहोत”, असे ट्विट नितेश राणे यांनी शुक्रवारी (२८ जून) केले आहे. त्याचप्रमाणे, गुरुवारी (२७ जून) उच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देखील नितेश राणे यांनी ट्विट केले होते. “उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत जो ऐतिहासिक निर्णय दिला आहे त्या लढ्याचा मी एक भाग होतो यासाठी मी स्वतः ला भाग्यवान समजतो. या न्यायालयीन लढाईच्या अंतिम निर्णयात याचिकाकर्ते म्हणून माझे नाव होते त्याचा मला अभिमान आहे”, अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संकटांनी ग्रस्त शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Aprna

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार अन् फडणवीसांमध्ये जुंपली

News Desk

शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील, मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

News Desk