HW News Marathi
महाराष्ट्र

कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण कराल तर मुंबई पोलीस कमी पडणार नाही! – संजय पांडे

मुंबई | कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण कराल तर मुंबई पोलीस कमी पडणार नाही, अशा इशारा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिला आहे. संजय पांडेंनी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जनतेची संवाद साधताना म्हणाले. जे लोक कायदा आणि सुव्यवस्थेवर बिघडवण्याचा प्रयत्न करणार, त्यांच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करणार असून या कारवाईदरम्यान संयम बाळगा, अशा सूचनाही पांडेंनी दिल्या आहेत.

संजय पांडे म्हणाले, “मुंबई आयुक्त झाल्यानंतर मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंबईकरांशी संवाद साधतो. मुंबईची आजची परिस्थिती आपण पाहिली तर वेगवेगळे पक्ष आणि समाज याच चर्चा सुरू आहे. आणि त्याचे सण पण सुरु आहेत. मी काही वृत्रपत्र आणि मीडियामध्ये वाचत असतो. लोक म्हणतात सध्याची परिस्थिती थोडीफार नाजूक आहे. पण, मी पोलिसांच्या वतीने सांगू इच्छितो की, पोलिसासाठी परिस्थितीही नाजुक किंवा सामान्य नसते. पोलिसांसाठी सर्व परिस्थिती ही नाजुकच असते. मुंबई पोलीस हे त्यांची जबाबादारी योग्य पद्धतीने पार पाडणार आहे.”. 

आपल्या प्रदेश आणि शहराला शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू

“कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईल, असे मला वाटत नाही. पण, काही लोकांनी ते करायचा प्रयत्न केला. तर मुंबई पोलीस कमी पडणार नाही, यांची मला पूर्ण खातरी आहे. जे लोक कायदा आणि सुव्यवस्थेवर बिघडवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कारवाई करताना आपण संयम बाळगा. परंतु, पोलिसांनी बघ्याची भूमिका करणार नाही. पोलीस हे कायदा आणि नियमाप्रमाणे कारवाई करणार, अशी माझी अपेक्षा आहे. आता मी प्रत्येक आठवड्याला महाराष्ट्र पोलीस माहिती नेटवर्क अधिकृत युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी काय करणार आहोत.  यासंदर्भात आम्ही तुम्हाला सुचना देऊ, माझा आपल्यावर विश्वास आहे आणि तुम्ही तो कायम ठेवणार. आपले मुंबई शहर हे आज आणि उद्याही शांत राहणार आहे. महाराष्ट्रातील लोक हे शांतप्रिय लोक आहोत. कोणत्याही प्रकारची अशांत घडवून आणायचा प्रयत्न असेल तर त्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत. या माध्यमाद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छतो की, मी पण तुमच्या पाठिशी आहे. आपण सर्व आपल्या प्रदेश आणि शहराला शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू. आणि कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याची आपण पूर्ण खात्री करू., असे संजय पांडे म्हणाले.

संबंधित व्हिडिओ

https://www.youtube.com/watch?v=Bog1P2caV4M

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेच्या निवडणुका २ वर्षे पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

News Desk

… लोकांना उल्लू बनविण्याचे धंदे करत आहात!; जलीलांची राज्य सरकारच्या मराठी पाट्यांवर टीका

Aprna

राज्याचे सत्तांतर प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच; 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी

Aprna