HW News Marathi
देश / विदेश

फडणवीसांनंतर शरद पवारांनी मोदींना केलं टार्गेट ! ‘मी मोदींचा गुरू नाही’

मुंबईशिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉनमुलाखत घेतली. ही मुलाखत दिवस प्रदर्शित केली जाणार आहे. मुलाखतीचा दुसरा भाग आज रविवार(१२ जुलैला) प्रदर्शित झाला.

पहिल्या भागात शरद पवार हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना पाहायला मिळाले. आता दुसऱ्या भागात पवारांनी मोदिंना टार्गेट केलं आणि उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ च्या निवडणुकीनंतर बारामतीत आले असताना शरद पवार हे माझे गुरु आहे आणि त्याचं बोट धरून आपण राजकारणात आलो आहेत असं वक्तव्य केलं होतं.संजय राऊतांनी त्यावर पवारांना प्रश्न विचारला असता , राजकारणात कोणी कोणाचाच गुरु नसतो, फक्त सोय पाहिली जाते असा टोला पवारांनी मोदींना लगावला आहे.

शरद पवार म्हणतात की, मी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) गुरु आहे असं सांगून त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाहीअडचणीत आणू नका. राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडतअसतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही असं त्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून फास्ट टॅग नसेल तर भरा दुप्पट टोल…!

News Desk

देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘INS विक्रांत’ नौदलात सामील

Aprna

सीबीआय प्रकरणी ट्विट केल्यामुळे प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

News Desk