HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेची तात्काळ मतमोजणीचे आदेश

औरंगबाद | लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेची मतमोजणी करुन तात्काळ निकाल जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. आणि अपात्र ठरवलेल्या १० नगरसेवकची मते एकत्रित करुन मतमोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एक. के. कोतवाल या दोन्ही न्यायाधीशांनी हा आदेश दिले आहे. मतमोजणी सुरू असून दुपारी चारपर्यंत निकाल हाती येऊ शकेल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी यांच्यात चुरशी लढत मानली जाते. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीचे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे हे दोघे ही आमने सामने आहेत. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी पाठिंबा दिला आहे. विधानपरिषदेच्या ६ जागांवर २१ मे रोजी मतदान झाले. तर २४ मे रोजी ६ जागांपैकी ५ जागांचा निकाल लागला. विधानपरिषदेच्या फक्त लातूर-उस्मानाबाद-बीड या जागेचा निकाल मागे राहिला होता.

  • नेमके काय आहे प्रकरण

बीड नगर परिषदेतच्या दहा सदस्यांनी पालिकेत कचरा टाकला म्हणून राज्यमंत्री रणजित पाटील यांनी १० जणांना अपात्र ठरवले होते. बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष हेमंत रविंद्र क्षीरसागर, प्रभाकर पोकळे, सय्यद फारूख, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, हाश्मी इद्रीस, मोमीन अझरोद्दीन आणि रणजीत बनसोडे ही १० अपात्र नगरसेवकांची नावे आहेत. त्यामुळे उस्मानाबाद विधानपरिषदेचा निकाल लांबणीवर पडला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्हीच असे हतबल होऊन आत्मबलिदान दिले तर मला चांगले वाटणार का?

News Desk

NCBच्या कर्मचाऱ्यांवर ड्रग्स पेडलर्सचा हल्ला, NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे जखमी

News Desk

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण चौकशीसाठी प्रविण दरेकर पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना

Aprna