HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

तातडीने स्थलांतर थांबवा, ‘राज्यपालांचे’ सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामूळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. त्यामूळे नागरिक शहरातून गावाकडे जात आहेत. आज (२८ मार्च) याच स्थलांतराने ७ प्रवाशांच्या जीव धोक्यात अडकला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर या ७ प्रवाशांचा पायी चालत जाताना अपघात झाला. या स्थलांतराच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व विभागीय आयुक्तांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधत तातडीने नागरिकांचे स्थलांतर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व ६ विभागीय आयुक्तांशी चर्चा करत कोरोनाचे वाढते संक्रमण आणि त्यामूळे नागरिक करत असलेले स्थलांतर याबद्दल माहिती घेतली. नागरिकांना ते जिथे अयतील तिथेच थांबवण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

औद्योगिक वसाहतींमध्ये उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या नागरिकांनी थांबावे, अशी विनंती करत त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची सोय सरकार करेल असेही यावेळी राज्यपालांनी सांगितले. तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील तिथेच थांबण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण व पुणे येथील विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. आता निदान राज्यपालांच्या याआदेशाचे तरी पालन करत नागरिक स्थलांतर थांबवतील का? असा प्रश्न उद्भवला आहे.

Related posts

पुलवामा प्रकरणावरून ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सना सानियाचे खडे बोल

News Desk

नागरिकांकडे राशन कार्ड नसेल तर आधार कार्ड ग्राह्य धरावे, फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk