HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्याची ही वेळ नाही, संभाजीराजेंची भूमिका !

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा धक्कादायक निर्णय दिला. यानंतर मराठा समाजातून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्य़ात आला. तरुणांमध्ये अस्वस्थता असून त्यांना नोकरीची चिंता आहे. आता यावर संभाजीराजे छत्रपती यांनी काल (१८ मे) एक ट्विट केलं होतं. त्याबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की,”राज्याचे अधिकार काढून घेतले का ? केंद्र सरकारने घेतलेली भूमिका यावर सगळं बोलणार आहे. पण सध्या कोरोनाची महामारी थांबविणे गरजेचे आहे. लवकरचं माझी भूमिका स्पष्ट करेन असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज (१९ मे) पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे.

आरक्षणासाठी आता मोर्चे काढण्याची, उद्रेक काढण्याची वेळ नाही. सध्या कोरोनाचं संकट रोखण्याची गरज आहे, आपण जगलो तर आरक्षणाचा लढा लढू शकतो. मराठा समाजात नाराजी, अस्वस्थता आहे त्यावर मी लवकरच बोलणार आहे. आरक्षणासाठी नेत्यांना भेटायची गरज नाही, मराठा आरक्षण अभ्यासक, गायकवाड न्यायाधीश यांची भेट घेणार असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाबाबत लवकरच भूमिका जाहीर करू असं ट्विट केलं होतं. त्याबाबत संभाजीराजे म्हणाले की,”काल ट्विट यासाठी केलं की मराठा समाजात संभ्रम अवस्था आहे. कोर्टाचा निकाल आल्यावर राजकीय वातावरण गरम झालंय. थोड्याच दिवसांतच माझी आणि समाजाची भूमिका जाहीर करणार आहे. त्याआधी समाजाशी आणि तज्ज्ञांची चर्चा करून भूमिका मांडणार आहे.”आरक्षणावर सगळं सविस्तर सांगतो. माझी भूमिका म्हणजेच शाहू महाराजांची भूमिका आहे. प्रत्येक राजकीय पक्षांकडून वेगवेगळी भूमिका घेण्यात आली आहे. त्यांची आणि माझी भूमिका वेगळी आहे. माझी भूमिका वैयक्तिक नसणार आहे. यावर लवकरच भाष्य करू असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

AIMIM चे खासदार इम्तियाज जलील ताफ्यासह चांदिवलीच्या सभेसाठी मुंबईत दाखल

News Desk

शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध, दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी

News Desk

आमदार दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, औरंगाबादेत तक्रार दाखल

News Desk