HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे एकमेव विजयी नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. यंदाच्या लोकसभेत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद मतदारसंघात सतत ४ वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव केला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इम्तियाज जलील यांनी मिळवलेला हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.

इम्तियाज जलील यांनी केलेला चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा खैरे यांच्या संपूर्ण ३१ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला पराभव ठरला. दरम्यान, विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी इम्तियाज जलील यांच्याकडे एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

शहा, उद्धव बैठक अखेर संपली, दोन तास झाली दोघांमध्ये चर्चा

धनंजय दळवी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण दडपण्याचा आरोप, डीसीपी कार्यालयावर मोर्चा

News Desk

राज्यात १० ते १३ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता !

News Desk